Uncategorized

दिलासादायक ! व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १७१ रुपयांनी झाला स्वस्त

दिल्ली : आज १ मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. आजपासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती १७१.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर ‘जैसे थे’ आहेत. मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांना वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग दोन महिने कोणतीच दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आल्याने देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १८५६.५० रुपये, कोलकातामध्ये १९६०.६० रुपये आणि चेन्नई २०२१.५० रुपये झाले आहेत. तर मुंबईत १८०८.५० रुपये इतकी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत झाली आहे. याआधी १ एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ९१.५० रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर १७१.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर २६१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर ठरवतात, त्यानुसार आज १७१.५० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page