महाराष्ट्रमुंबईराजकारण

पुन्हा राज गर्जना! मुंबईत रविवारी मनसेचा मेळावा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिका-यांचा मेळावा रविवार, दि. २७ जुलै रोजी पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सायंकाळी ५ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेच्या या मेळाव्याला मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबईतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, मुंबईतील सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परप्रांतीय हिंदी भाषिकांवर भाष्य करण्याची शक्यता

मीरा रोड येथील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीय हिंदी भाषिकांना गंभीर इशारा दिला होता. कोणी मराठीचा अपमान करत असेल तर त्याच्या कानाखाली जाळ काढा असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला अमराठी व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्यामुळे आता या मुद्यावर राज ठाकरे काही बोलणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page