पुणे शहर गुन्हे शाखेच्या तपासात चोरांकडून ५४ लाखांची १६२ दुचाकी वाहने जप्त
अल्पवयीन बालकासह १७ आरोपी गजाआड

पुणे : गुन्हे शाखेकडून १६२ दुचाकी वाहने, ५४,६७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष मोहिमेदरम्यान एकूण १७ आरोपी व अल्पवयीन बालक यांना पकडून ५४ लाख ६४,००० रुपये किंमतीची एकूण १६२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. युनिट-६ कडील पोलीस उप निरीक्षक सुरेश जायभाय व पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि सचिन पवार यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सचिन प्रदिप कदम (वय ३२ रा.जि. धाराशिव) अजय शेडे (वय ३२ वर्षं, सहजपूर म्हस्कोबा चौक, जि.पुणे) परमेश्वर भैरवनाथ मिसाळ ( वय २८ गोविंदपुर, कळंब, धाराशिव) युवराज सुदर्शन मुंढे( वय २३ वर्षे, गोविंदपुर, कळंब, धाराशिव) यांना वाहनांसह पकडून ३३ लाख ४० हजार किंमतीची १०० दुचाकी वाहने केली आहे. त्यासाठी पोलीस पथक मागील एक महीन्यापासून लातूर, उस्मानाबाद, बीड या भागात वेशांतर करुन तपास करत होते. त्यामध्ये या भागातील आठवडी बाजार, यात्रा, गर्दीची ठिकाणे टारगेट करून शोध सुरू होता. त्यावेळी माहिती समजली की गोविंदपुरा जि. धाराशिव येथील सचिन कदम, युवराज मुंढे व परमेश्वर मिसाळ चोरीच्या मोटरसायकल विक्री करतात. १० एप्रिल रोजी मुंडे व मिसाळ दोघेही मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्याकडे विचारपूस केली असता ती मोटरसायकलही त्यांचे मित्र शेंडे व गरड यांनी चोरी करून त्याच्याकडे विक्रीसाठी दिली असल्याचे सांगितले. अधिक चौकशी करुन साथीदार सचिन प्रदीप कदम (रा. देवधानोरा ता. कळंब जि.उस्मानाबाद) वाला सुध्दा अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमधून अजय रमेशराव शेंडे (रा. सहजपुर ता. दौड़, जि.पुणे) व शिवाजी उत्तम गरड (रा. करंजी वा रिसोड जि. वाशीम) व तीन साथीदार पुणे शहर व परिसरातून मोटरसायकल चोरी करुन विक्रीसाठी देव असल्याचे सांगितले. लातुर, धाराशिव व बीड भागात ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना कागदपत्रे नंतर आणून देतो असे सांगून मोटार सायकली विकत.

ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिकदृष्ट्या परवडेल व वापरासाठी उपयुक्त ठरेल अशा स्प्लेंडर व एचएफ डिलक्स गाड्या विकत घेण्याचा जास्त कल असतो. ही बाब हेरुन आरोपींनी जास्तीत जास्त स्प्लेंडर व एएफ, डिलक्स गाड्या चोरी केलेल्या आहेत. आरोपीपैकी अजय शेंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १५ गुन्हे दाखल आहेत. त्याने पुणे शहर व इतर युनिट आणि जिल्हयातील वाहने साथीदार आरोपींच्या मदतीने चोरी करुन ती लातूर, धाराशिव व बीड भागामध्ये कमी किमतीत विक्री करीत. सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून अधिक तपास चालू आहे. युनिट-५ कडील अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे १) संकेत नामदेव भिसे (वय २३ वर्षे रा. विनम्र सोसायटी, शेवाळवाडी) २) आदित्य बाळु मुळेकर (वय २० वर्षे रा. माळवाडी, हडपसर) ३) वैभव नागनाथ बिनवडे (वय २० वर्षे रा. गल्ली नं. १६ सय्यदनगर, हडपसर) पुणे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात एकूण ५,४०,००० च्या १४ दुचाक्या जप्त करण्यात आल्या. यातून पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील गुन्हे उघडकीस आणले गेले. आरोपीपैकी वैभव नागनाथ बिनवडे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून जबरी चोरी व वाहन चोरीचे ८ गुन्हे दाखल आहेत. आरोपी मौजमज्जेसाठी वाहन चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. युनिट-४ कडील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार १) राहुल राजेंद्र पवार, (वय २१ वर्षे, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे मुळ रा. भिल्लारवाडी, जिती, ता. जि. सोलापूर) २) गौरव ऊर्फ पिन्टया मच्छिंद्र कुसाळे (वय ३८ वर्षे, रा. सर्व्हे नंबर १० वडारवरती, येरवडा) ३) संतोष अशोक कुमार सक्सेना ऊर्फ समिर शेख (वय-२९ वर्षे, रा. सर्व्हे नंबर८/१, कंजारभाट वस्ती, येरवडा) व ४) प्रशांत ऊर्फ पप्पू सुबराव ठोसर ( वय-३६ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत औंध) यांना पकडून ५,५५,००० किंमतीची ९ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. संतोष अशोक कुमार सक्सेना ऊर्फ समिर शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वाहन चोरीचा १ गुन्हा दाखल आहे. आरोपी बाजारपेठ, भाजीपाला मार्केट, हॉटेल रेस्टॉरंटच्या बाहेर अशा गर्दीच्या ठिकाणी रेकी करून तेथे दुचाकी चालक आपले गाडीची चावी विसरुन गेला असल्यास अशाच गाडया चोरी करत, नंतर स्वतः वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ कडील अधिकारी व अंमलदार वाहन चोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. एका माहितीवरून आरोपी १) किशोर उत्तम शिंदे (वय ३० वर्षे, रा. वेताळ वस्ती भापकरमळा मांजरी बुद्रुक ) २) शाहिद कलिम शेख (वय १९ वर्षे, रा. लेन नं. १, दिगंबर नगर, वडगांवशेरी) ३) अमन नाना कनघरे ( वय १९ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, सुंदराबाई शाळेजवळ, चंदननगर) ४) नागनाथ आश्रुबा मेढे (वय २९ वर्षे, रा. साईनाथनगर वडगांवशेरी) ५) ओंकार प्रफुल्ल टाटीया (वय २२ वर्षे, रा. जैन मंदीराजवळ, कात्रज ) व ६) एक अल्पवयीन बालक यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५,६७,००० किंमतीच्या २१ दुचाक्या जप्त करण्यात आल्या.यामुळे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट-२ कडील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भगवान राजाराम मुंडे ( वय ३२ वर्षे, रा. परभणी) यास पकडून ६ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. तसेच इतर १३ वाहने मिळून आली. त्याबाबत तपास चालू आहे. अशा प्रकारे एकुण १९ दुचाकी एकुण ४,६५,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) नारायण शिरगावकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे १) सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उप निरीक्षक सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार मच्छिंद्र विटकर, नितीन मुंढे, सविना कारकिले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, प्रतिक वाहीगुडे, प्रमोद मोहीत, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश ताकवणे, नितीन घाडगे,ज्योती काळे, अश्फाक मुलाणी, सुहास तांबेकर. युनिट-५ : पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, दया शेंगर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख अमित कांबळे युनिट-४ : पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव,, उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, नागेश कुंबर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे, मनोज सांगळे. दरोडा विरोधी पथक-२ : पोलीस निरीक्षक सुनिल पंदरकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विवेक पाडवी, फौजदार गुंगा जगताप, पोलीस अंमलदार विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, संदीप येळे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले. युनिट २ : पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक निरिक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार, मोहसिन शेख, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार,पुष्पेंद्र चव्हाण, प्रमोद कोकणे, कादीर शेख,पुणे समीर पटेल. यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली.



