पुणे शहर
गिरीधर साठे यांना वाचन संस्कृती रुजवण्यासाठीच्या योगदानाबद्दल पुरस्कार

पुणे : ग्रंथालय व वाचन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच चिपळूण येथील शिरळ वाचनालयाचे संस्थापक-अध्यक्ष गिरीधर साठे यांना वाचन संस्कृती रुजवण्यासाठीच्या योगदानाबद्दल ‘पुणे नगर वाचन मंदिर’च्या वतीने ‘ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरळ येथील वाचनालयाच्या माध्यमातून साठे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वाचन संस्कृती
रुजवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यांच्या ग्रंथालयात २५ हजारहून अधिक पुस्तके उपलब्ध असून परिसरात मोठ्या प्रमाणात त्यांचे वाचन केले जाते.
पुरस्कारानिमित्त झालेल्या भेटीत ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रसाद भडसावळे यांनी गिरीधर साठे यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.



