गुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्र

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असा संशयित आरोपी वाल्मिक कराड याच पोलिसांपुढे आत्मसमर्पण !

सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकऱणातील फरार १००हून अधिक आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली.

पुणे प्रतिनिधी :  बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. आतापर्यंतच्या सीआयडीने केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची १०० हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे.

वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा संशयित वाल्मिक कराड हा फरार होता. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

याशिवाय आतापर्यंत सीआयडीने या प्रकरणात जप्तीही सुरू केली आहे. सीआयडीकडून या प्रकरणात खंडणी, हत्या, अॅट्रोसिटी प्रकऱणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. यात वाल्मिक कराडची १००हून अधिक बँक खाती सील करण्यात आली आहे. म्हणजेच आता या खात्यांमधून वाल्मिक कराडला पैशांचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यासोबत त्यांची आणखी कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत. त्याचाही शोध सुरू आहे. तसेच या जप्तीसंदर्भात उच्च न्यायालयाकडे पत्र सादर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page