गुन्हेगारीबीडमहाराष्ट्रसामाजिक

बीडमध्ये माजी सरपंचाचा तरुणावर कोयत्याने हल्ला

बीड : जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका माजी सरपंचाने तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले असून, शेतरस्त्याच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी माजी सरपंचावर कारवाई करत न्यायालयात हजर केले.

गोरख काशीद असे हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव आहे. तो साक्षाळ पिंपरीचा माजी सरपंच आहे. तर, प्रकाश काशीद असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेतरस्त्याच्या वादातून प्रकाश आणि गोरख यांच्यात वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी वाद विकोपाला गेला. यानंतर गोरख यांना राग अनावर झाला. त्यांनी प्रकाश याच्या डोक्यावर धारदार कोयत्याने वार केला .

रक्तबंबाळ झाल्यानंतर प्रकाश खाली कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर माजी सरपंचाविरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली. त्यांनी माजी सरपंच गोरख काशीद याला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page