गुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहर

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उध्वस्त, ४७७१ किलो गांजा जप्त, वाघोली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

पुणे : आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे एकुण ४ आरोपी वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने ताब्यात घेतले. यामुळे आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उद्ध्वस्त झाले.‌ ४७७१ किलो गांजा व एक मोपेड मोटारसायकलसह १ लाख ४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१) सौरभ नामदेवराव तपासे (वय २२ वर्ष, रा.मु. पो. अल्लीपुर ता. हिंगणघाट जि. वर्धा) २) नागेश सुनिल लष्करे (वय २० वर्षे, रा. गोरे वस्ती, वाघेश्वर नगर, वाघोली. ३) रिझवान इस्माईल शेख (वय ३९ वर्षे, रा. गोरे वस्ती, वाघेश्वर नगर, वाघोली) एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले गेले.

२६ फेब्रुवारी रोजी रात्रौ १.१५ च्या सुमारास वाघोली पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी वैजीनाथ केदार, हवालदार २५६४/कर्णवार व ६५१६/मोटे, शिपाई १०५९४/माने, २७७०/कोकरे, ४५८५/रोकडे, २६०८/गायकवाड ४८४४/वाघ, १०५४२/बोयणे, १०४३७/कुंभार, गणेश आव्हाळे असे गोरे वस्ती, भावडी रोड वाघोली येथे पेट्रोलिंग करत होते. ६५१६/मोटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चौघांना ताब्यात घेण्यात आले. वाघोली पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी. एस. ऍक्ट कलम ८ (क), २०(ब). (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगीरी अमितेश कुमार (पोलीस आयुक्त) रंजनकुमार शर्मा ( सह पोलीस आयुक्त ) मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग) हिम्मत जाधव (पोलीस उप आयुक्त परीमंडळ ४) प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पंडीत रेजितवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे) सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक आहीरे, तपास पथकाचे इन्चार्ज वैजीनाथ केदार आदींनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page