पुणे शहरमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

लंडनमधील ‘ग्लोबल बिझनेस अँड एज्युकेशन’ परिषदेत राजू वाघमारे यांना जागतिक प्रेरणा पुरस्कार

नवी दिल्ली : लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या’ग्लोबल बिझनेस अँड एज्युकेशन’ परिषदेत, ऐतिहासिक लंडन संसदेच्या व्यासपीठावर नांदेडचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार राजू वाघमारे यांना प्रतिष्ठेचा जागतिक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रातील विविध पुरस्कार विजेत्यांना समाजातील अपवादात्मक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. जागतिक प्रेरणादायी पुरस्कार, ट्रायडेंट इव्हेंट्स अँड मीडिया लिमिटेड (यूके) आणि टी एक्सक्लुझिव्ह लाईफस्टाईल अॅंड मिडीया प्रा.लि.द्वारे संयुक्तपणे देण्यात आले. कौन्सिलर, लंडन बरो ऑफ साऊथवार्क क्लियो सोनेस, लंडनचे माजी उपमहापौर सुनील चोप्रा, विनू भट्टेसा, वाशू भगनानी आणि डॉ ख्रिश्चन जीन नोएल प्रेड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‌

राजू वाघमारे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत असून अनेक सामाजिक संघटनांशी संबंधित आहेत. त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून आचार्य अत्रे पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यांचा त्यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page