गुन्हेगारीसामाजिक

लोणी काळभोर परिसरात हातभट्टी दारू विक्री धंद्यावर कारवाई

पुणे : लोणी काळभोर परिसरात नायगाव रोड कुंजीरवाडीत हातभट्टी दारू विक्री होत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. भाऊसाहेब विश्वनाथ बुरुंगे (वय ४१, राहणार नायगाव रेल्वे फाटक जवळ तालुका हवेली) यास पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून एकूण ३,५०० रुपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली.

हा धंदा साईनाथ लोंढे ( कुंजीरवाडी तालुका हवेली) याचा असून त्याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष मोहिमे अंतर्गत प्रोहिबिशन प्रमाणे कारवाई करण्यात आली.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार रवींद्र रोकडे यांना माहिती मिळाली की एका ठिकाणी ओळखीच्या लोकांना हातभट्टी दारु विकली जाते. त्यानुसार कारवाई करण्यात आली.

आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले,अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी सांगितली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page