नवी दिल्लीमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रीयसामाजिक

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीतील नावे महाएसईसीव्होटरलिस्ट या संकेतस्थळावर (वेबसाईट) शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक (दुवा) राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. त्याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा-नगरपंचायती इत्यादींच्या मतदार यादीसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपये प्रमाणे शुल्क भरावे लागेल.

या यादीतील नावे शोधण्यासाठी

https://mahasec.maharashtra.gov.in/ या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरही संबंधित लिंक उपलब्ध आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल, तर नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात मिळेल.

या मतदार यादीच्या प्रतींसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय, प्रारूप आणि अंतिम मतदार यादीची विनाछायाचित्र पीडीएफ स्वरूपातील प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना आपली नावे तपासण्यासाठी आणि आवश्यक त्या सुधारणांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page