महाराष्ट्रमुंबई

स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठ्ये, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, उपसचिव (विधी) सायली कांबळी, अवर सचिव विजय कोमटवार, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्टयपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page