कोल्हापुरातील वाॅंटेड आरोपीस पाटील इस्टेट मध्ये पकडले
पायी गस्त घालताना शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून पुणे शहरामध्ये सायंकाळी पोलीस स्टेशन हद्दीत पायी गस्त घातली जात आहे. या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना कोल्हापूर येथील एक रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी पाटील इस्टेट भागात पकडण्यात आला.
पाटील इस्टेट झोपडपट्टी जवळ इराणी वस्ती येथे तो आलेला होता. सादिक अली. आर. सरगिरो ऊर्फ दादु ऊर्फ राजा भवानी ऊर्फ रझा हुसेन इराणी, (वय-२८ वर्षे, रा. जन्नत नगर, ता. धारवाड विजयागिरी, जि. हुबळी राज्य कर्नाटक ) असे त्याचे नाव आहे. शाहुपुरी (जि. कोल्हापुर ) पोलीस स्टेशन येथील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
खाशाबा जाधव ग्राऊंड, इराणी वस्ती, शिवाजीनगर येथे बातमीप्रमाणे एक जण संशयास्पदरित्या पायी पेट्रोलींग दरम्यान आढळून आला. ताब्यात घेऊन चौकशी केली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे येऊन त्याची अधिक चौकशी केली. तो शाहुपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापुर येथील गुन्हा रजि नंबर-१५६/२०२१ भा. दं. वि- ३९२, ३४ मधील पाहिजे आरोपी असल्याचे समजले. त्याअनुषंगाने त्याबाबत पोलीस निरीक्षक, शाहुपुरी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली. तो वर पाहिजे असलेला आरोपी असल्याची खात्री झाली. समन्वय साधून आरोपीस एल. सी. बी कोल्हापूर यांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस उप-निरीक्षक प्रताप साळवे पथकासह पायी गस्त घालत असताना आरोपीची माहिती समजली. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त. सन्दीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग वसंत कुंवर, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे पोलीस उप- निरीक्षक प्रताप साळवे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे, ग्रेड पोलीस उप-निरिक्षक सावंत, सहाय्यक फौजदार भिवरे, हवालदार राजपूत तसेच सोनवणे, साठे, शिंदे, पोलीस नाईक कांबळे यांनी सहभाग घेतला.




