गुन्हेगारीपुणे शहर

बँकेत लोकांना फसवून लुबाडणारे हरियाणवी त्रिकुट गजाआड

लष्कर पोलिसांना १९ गुन्हे उघडकीस आणण्यात

पुणे : बँकेतून पैसे काढण्यासाठी, भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून चलाखीने त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरे, परराज्यात अशा प्रकारचे गुन्हे केले असून त्यांच्याकडून १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले.

दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय ४७ ), सुनिल रामप्रसाद गर्ग (वय ३७, दोघेही रा. पानीपत, हरियाणा) सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी ( रियाना, हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना कर्मचारी असल्याचे भासवून आरोपी फसवणूक करायचे. राज्यासह परराज्यात देखील अशाप्रकारचे काही गुन्हे केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

पुण्यातील जनरल थिमया रोडवरील इंडसइंड बँकेत १३ जून रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास गुन्हा घडला होता. फिर्यादी ढोले पाटील रोडवरील कंपनीत कामाला असून त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकाने बँकेतून ३ लाख रुपये काढून आणण्यासाठी धनादेश दिला होता. त्यांनी बँकेतून पैसे काढले. रोकड बँगेत ठेवत असताना कॅश काऊंटरजवळ असलेल्या एकाने त्यांना पेन्सिल खुणा केलेले व हळद लागलेले बंडल कॅशिअरने परत मागितले आहे असे सांगितले.

तो बँकेचा माणूस वाटल्याने त्यांनी त्यातील एक बंडल त्याच्याकडे दिले. ते घेऊन तो नजर चुकवून पसार झाला होता.

लष्कर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन दिपककुमार याला साथीदार सुनिल याच्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरजकुमार यालाही अटक करण्यात आली. या तिघांनी मिळून राज्यातील विविध शहरांसह गुजरात आणि प्रदेशातही अशा प्रकारचे गन्हे केले आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर एन राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे , पोलीस अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोऱ्हाडे, रमेश चौधरी यांनी ही कामगिरी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page