गुन्हेगारीपुणे शहर

उच्चभ्रू सोसायटीत लपून छपून चालणाऱ्या जुगार अड्डयावर खराडी पोलिसांची कारवाई, २६ जणांना अटक

पुणे : खराडीमध्ये उच्चभ्रू सोसायटीत लपून छपून चालणाऱ्या जुगारावर अड्डयावर कारवाई करुन २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वल सिट्रिन या सोसायटीमध्ये एका बंद फ्लॅटमध्ये पोकर हा जुगार सुरू होता.

ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना प्राप्त झाली. ३० ऑगस्ट रोजी चव्हाण व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, व तपास पथकाने मार्वल सिट्रिन सोसायटीमधील फ्लॅट क्र. जे १२०२ या ठिकाणी पंचासमक्ष जाऊन छापा टाकला.

दोन टेबलांवर २४ जण समोरा समोर बसलेल्या अवस्थेत प्रत्येकाचे हातातध्ये प्लेइंग कार्ड (पत्ते) होते. टेबलावर कॉईन, आकडे असलेले कॉईन तसेच प्लेइंग कार्डचे बॉक्स असे सामान ठेवलेल्या अवस्थेत पोकर जुगार खेळताना एकुण २४ जण मिळून आले. सदानिका जुगाराचा अड्डा चालविण्यासाठी वापर करून पोकर जुगारासाठी वापरण्यासाठी श्लोक संजय संगतानी (वय २९ वर्षे रा. सातववस्ती, खराडी २) सिध्दांत संजीव कक्कर (वय ३५ वर्षे ) यांनी दिली होती.

वेगवेगळ्या रंगाचे कॉईन/चिप्स त्यावर पोकर असे इंग्रजीत लिहीलेले मिळून आले. प्लेइंग कार्ड, ६५०० रोख रक्कम, ४०,००० किंमतीचा एक आयफोन, काळया रंगाचा मोबाईल अशा एकूण ७७,१०० किंमतीच्या मुद्देमालासह मिळून आले म्हणून खराडी पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, व पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत कोद्रे, सरज जाधव, जयवंत श्रीरामे, विकास केदारी, महिला अंमलदार वर्षा कर्डीले यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page