गुन्हेगारीपुणे शहरसामाजिक

जुन्या पुण्यात कसबा पेठ आणि मंगळवार पेठेत मटका, जुगार अड्डे

फरासखाना पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

पुणे : मागील काही महिन्यांपासून फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये कसबा पेठ आणि मंगळवार पेठेत मटका, जुगार अड्डे सुरू असून या मध्ये मोठा पत्त्याचा क्लब व मटका जुगार अड्ड्यांचा समावेश आहे. फरासखाना पोलीस स्टेशन मधील नवीन कलेक्टर दादा या अवैध धंद्यांकडून वसुली करत पाठीशी घालत असल्यानेच स्थानिक पोलीस याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

मंगळवार पेठेत जुना बाजार भीम नगर, गल्ली नंबर २२८ येथे भला मोठा पत्त्याचा क्लब, जुगार अड्डा सुरू आहे. कसबा पेठ, कागदीपुरा येथे भंगार दुकाना जवळ मटका, जुगार अड्डा सुरू आहे. सदर मटका , जुगार अड्डा हा खैरमोडे नावाची व्यक्ती चालवत आहे. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी गर्दी जमा होत असून अनेक नागरिकांना याचा मोठा त्रास आहे. मंगळवार पेठेतील गल्ली नंबर २२८ मधील पत्त्याचा क्लब सुध्दा रात्रभर मोठ्या प्रमाणात चालतो. सदर जुगार अड्डा हा भर लोकवस्ती मध्ये असल्याने शांतताप्रिय स्थानिक नागरिकांना याचा रात्रीचा अधिक त्रास आहे. मात्र स्थानिक पोलिसांकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

नवीन वसूलीदादांमुळे काळे धंदे राजरोसपणे

वसूली करणाऱ्या ‘कलेक्टर’ किंवा ‘वसूली दादा ‘ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पुणे शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुलीवाल्यांची यादी आपल्याकडे आहे, असे सांगून संबंधितांची नियंत्रण कक्ष किंवा मुख्यालयात बदली केली होती. तथापि, फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंदे दुप्पट झाले आहेत. त्यामागे नवीन ‘वसूली दादा’च सक्रिय असल्याचे म्हटले जाते. पोलीस आयुक्तांच्या कारवाईनंतरही नवीन वसुली दादा पुन्हा फरासखाना मध्ये सक्रिय झाला कसा? त्याला वसुलीसाठी कोणी सांगितले? त्याला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे का? पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला हे माहीत नाही का? हे सर्व तपासून पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page