गुन्हेगारीपुणे शहर

भीक मागण्याचा बहाणा करुन चोरी करणारे दोघे गजाआड, ५२ तोळे सोन्याच्या दागिन्यासह ४० लाख ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंदननगर पोलिसांची दमदार कामगिरी

पुणे : भीक मागण्याचा बहाणा करुन उघड्या दरवाजावाटे घरात घुसत सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपींना चंदननगर पोलीसांनी जेरबंद केले. त्यात महिलेचा समावेश आहे.‌ १) कुमेश कांतीलाल पवार (रा. सावदरवाडी, वांगा ता. परांडा जि. उस्मानाबाद २) मिली दिपक पवार (वय-२० वर्षे, रा. आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. ३५,००,००० किंमतीचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच २६,६०० रोख रक्कम, व ५,५०,००० किंमतीची महिंद्रा इम्पेरिओ कंपनीची लाल रंगाची चारचाकी असा एकूण ४०,७६,६०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत उघड्या दरवाजावाटे घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरी झाली होती. गुन्हयामधील आरोपींचा व चोरीस गेलेल्या मालाचा तपास पथकाचे अधिकारी व तपास पथकातील अंमलदार शोध घेत होते. चोरीच्या अनुषंगाने चंदननगर, लोणीकंद व येरवडा, लोणीकंद व विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १५० ते २०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी तसेच तांत्रीक विश्लेषणाद्वारे लाल रंगाचे चारचाकी टेम्पोसारख्या गाडी व चोरी करणारी महिला व पुरुष यांची माहिती मिळाली होती.

चंदन नगर पोलीस स्टेशनचे हवालदार नाणेकर यांना माहिती मिळाली की, मागील दोन/तीन महिन्यापूर्वी पैसे व सोने चोरी करणारे व फुटेजमधील वर्णनासारखे संशयित आळंदी देवाची येथे लाल रंगाच्या चारचाकी टेम्पोसारख्या गाडीसह उभे आहेत.

पोलीस असल्याची चाहुल लागताच ते पळून जावू लागले. त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली. गाडीबाबत अधीक विचारपूस करता त्यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना चंदननगर पोलीस स्टेशनला आणून अंगझडती घेतली असता सोने व पैसे मिळून आले. त्यांनी सांगितले कि, सोने व पैसे हे आम्ही दि.१८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता टिंबर मार्केट येथील एका घरातून चोरी केले. खडक पोलीस स्टेशन अभिलेखावर पाहणी केली असता भादंवि ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तसेच चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नं. २४६/२०२४ भा.दं.वि कलम ३८० या गुन्हा बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा मागील ३ महिन्यापूर्वी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग मनोज पाटील पोलीस, पोलीस उपआयुक्त झोन – ४ हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे चंदन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नानदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शितल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page