गुन्हेगारीपुणे शहर

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील बडतर्फ पोलिस अधिकारी पुन्हा सेवेत

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

एका पोलिस अधिका-यासह चौघा जणांना पुन्हा पोलिस दलात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून ड्रग्जची तस्करी करणा-या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलिस हवालदार राजेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

मात्र आता या बडतर्फ केलेल्या अधिका-यांसह पोलिस कर्मचा-यांना पुन्हा गृह विभागाने पोलिस दलामध्ये समाविष्ट करून घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्जची तस्करी करत होता. या प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचा सहभाग आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. आता पुन्हा पोलिस दलाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करून घेतले आहे.

संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मॅट मध्ये धाव

अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) येथे धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page