गुन्हेगारीपुणे शहर

जैन साधकाच्या वेषात जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कारवाई 

पुणे : घाटकोपर, वाई, चिखली, डोंबिवली इत्यादी भागात सुमारे ८ ते १० ठिकाणी जैन मंदीरांमध्ये घरफोडीचे गुन्हे झाले होते. पुणे शहरातील ३ ते ४ जैन मंदिरांमधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता. कार्तिक पोर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदीरांमध्ये समारंभपूर्वक पूजाअर्चा करून समारंभ साजरा करीत असतात त्याच दिवशी या चोऱ्या झाल्याने खळबळ उडाली होती. या मंदिरांमध्ये जैन साधुच्या वेषात चोरी करणाऱ्यास अटक करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे.

 

नरेश आगरचंद जैन (रा. बोम्बे चाळ, रुम १९, दुसरा मजला, सुतार गल्ली, सी.पी. टैंक गिरगाव व्ही.पी. रोड मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत असून महाराष्ट्रातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर आहे.

जय परेश पारेख (रा- फ्लॅट नं ९०१ सिटीवुड सोसायटी, पुनावाला गार्डनसमोर) यांनी त्यांच्या घरातील जैन मंदिरातील देवाचा सोन्याचे मुकुट व सोन्याची चेन असे चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत भा.न्या. शं २०२३ चे कलम ३०५ अ) अन्वये गु.र.नं ४८८/२०२४ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शानाखाली विशेष तपास पथकाची निर्मिती करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण करून, सीसीटीव्ही फुटेज पाहून, तसेच पुणे ते मुंबई पर्यंत खबऱ्यांकडून माहिती काढत असताना, स्वारगेट पोलीस स्टेशन कडील हवालदार सागर केकाण यांना जैन याच्याबाबत माहिती समजली.

गिरगाव मुंबई या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव सांगितले. त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत कौशल्यपुर्व विचारपूस करता त्याने गुन्हा पैशांच्या चणचणीपाई केल्याचे कबुल केले.

चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चैन असे ४२०००० रुपयांचे दागिने जप्त करण्यात येवून स्वारगेट पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपी हा मंदिरात जाताना जैन साधकाच्या वेषात जाऊन देवाचेचश दागिने चोरी करत असल्याचे तपासात पुढे आले. यापूर्वी अशा काही चोऱ्या घडल्या असल्यास स्वारगेट पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी केले आहे.

ही कामगिरी अमितेशकुमार (पोलीस आयुक्त) रंजनकुमार शर्मा (पोलीस सह-आयुक्त) प्रविण पाटील (अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग) स्मार्तना पाटील (पोलीस उपआयुक्त परि- २) राहुल आवारे (सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोलीस निरिक्षक युवराज नांद्रे, पोलीस उप-निरिक्षक तानवडे, अंमलदार दिनेश भांदुर्गे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page