महाराष्ट्र

परभणी जिल्ह्यातील घटनेबाबत भारतीय बौद्ध महासभा मोखाडा यांच्या वतीने कायदेशीर कारवाईची मागणी

तहसीलदार मयूर खेंगले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्याकडे निषेधाचे पत्र देत निषेध व्यक्त

परभणी प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील संविधान विटंबना प्रकरण तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यु प्रकरण या दोन घटने संदर्भात आज मोखाडा येथील तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन मोखाडा येथे निषेध पत्र देत मोठ्या संख्येने समाज बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि तहसीलदार मयूर खेंगले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांच्याकडे निषेधाचे पत्र देत निषेध व्यक्त केला.

परभणी येथे संविधान प्रतिकृतिची विटंबिना एका इसमाने केली असता त्यावर कठोर कार्यवाई करण्यात यावी यासाठी राज्यभर सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.त्याचं अनुषंगाने मोखाड्यात देखील त्या समाज कंठकावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि सबंधितंवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी  यासाठी मोखाडा वाशियांकडून आणि भारतीय बौद्ध महासभा मोखाडा यांच्या वतीने मागणी ही निवेदनाच्या मार्फत केली जातं आहें.

परभणी येथील संविधान विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात ह्या घटनेचे पडसाद उमटले आहेत कारण ह्या प्रकरणाची पुरावृती कुठेच पुन्हा होऊ नये यासाठी आणि अशा गंभीर आणि धोकादायक घटना घडू नयेत यासाठी तीव्र पडसाद उमटत सम्पूर्ण राज्यात निषेध व्यक्त होताना दिसत आहें. यावेळी बौद्ध महासभेचे दीपक कडलक,अरुण जगताप,प्रकाश दोंदे,संजय साळवे,कुणाल जगताप, कुणाल काशिद, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पालघर धम्मपाल शेजवळ,ज्ञानेश्वर पालवे, देवराम सोनावणे,संदीप शिंदे आदि उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page