आंतरराष्ट्रीयसामाजिक

लेबनॉनवरील हल्ले थांबविण्याची इराणची मागणी

अन्यथा शस्त्रसंधी रद्द करण्याचा इशारा

वाॅशिंग्टन : इस्त्रायलने लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबविण्याची मागणी इराणने केली असून ही मागणी मान्य न झाल्यास शस्त्रसंधी रद्द करण्याचा इशारा इराणने दिला आहे.जोपर्यंत लेबनॉनवरील हल्ले थांबवली जाणार नाहीत, तोवर युद्धबंदी करार बैठकीत सहभागी होणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली असून आता पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे.

अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांकरिता युद्धबंदी लागू करण्यात आली असून इस्लामाबाद येथे युद्धबंदी कराराची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी इराणकडून काही अट घालण्यात आल्या आहेत. जर त्या अटी मान्य झाल्या तरच इराण या बैठकीत सहभागी होणार आहे.

बेल्जियमचे परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रेव्होट यांनी देखील लेबनॉनवरील इस्रायली हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. इराण-अमेरिका युद्धबंदी लेबनॉनलाही लागू झाली पाहिजे यावर जोर दिला आहे. इराणकडूनही युद्धबंदी करार करण्याकरिता हीच मोठी अट ठेवण्यात आली.

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत असला तरी इराणकडून पाकिस्तानची मध्यस्थी नाकारण्यात आली. पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या विषयात इस्त्रायलनेही पाकिस्तानला टोकले. पण अमेरिका पाकिस्तानला पुढे घालताना दिसत आहे. अमेरिकेची ढाल बनण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.

दरम्यान इराणने १० कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला पाठवला होता. मात्र या प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केराच्या टोपली दाखविल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

दरम्यान इराणचा १० कलमी प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे ट्रम्प यांनी शरणागती पत्करल्याचे सूचक असले तरी ट्रम्प तडजोड म्हणून इराणच्या मागण्यांचा प्रस्ताव कधीही स्वीकारणार नाहीत. ट्रम्प केवळ अशाच कराराचा पाठपुरावा करतील जो अमेरिकन लोकांच्या सर्वोत्तम हिताचा असेल, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page