गुन्हेगारीठाणेमहाराष्ट्र

कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण

ठाणे प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला या परप्रांतियाने क्षुल्लक कारणांवरुन अभिजीत देशमुख यांना मारहाण केली होती. यानंतर परप्रांतीय विरुद्ध मराठी हा वाद उफाळून आला. पुढे गृहविभागाने अखिलेश शुक्लावर कारवाई केली. याला काही दिवस उलटत नाहीत तोवर पुन्हा कल्याणमधूनच धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुन्हा एकदा एका परप्रांतीय इसमाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे.

चार वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे.

मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला आहे तर तरुणाच्या पत्नीला, आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलिस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page