गुन्हेगारीपुणे शहर

पोर्शे अपघातानंतर पुन्हा एकदा येरवडा हद्दीत धनदांडग्याच्या भरधाव कारमुळे एअरपोर्ट रोडवर दोन जखमी

पुणे : पोर्श कार अपघातानंतर सुध्दा धनदांडग्या लोकांच्या दारचडो उन्मादी पोरांचा उपद्रव थांबण्याचे नाव नाही. रात्री सव्वा आठ वाजता एम एच १४ एल ए १३७५ या अत्यंत भरधाव कारने धडक दिल्याने एका मोटरसायकलस्वारासह दोघे जखमी झाले. एअरपोर्ट रोड , नेक्सा शोरूमच्या अलीकडे साकोरे नगर येथे आज रात्री या अपघातातून भीषण अपघात होता होता राहिला.‌‌ अतिशय वेगाने संबंधित कारचालक चालला होता‌ एम एच. १२ पी वाय ३८०८ या मोटरसायकल स्वारा सह दोघांना जखमी करुन तो थांबला अन्यथा आणखी अपघात झाले असते. कारच्या बेदरकारपणे चालवण्यासाठी जबाबदार असलेल्या तरुण चालकामुळे  प्रितेश नवले, आकाश साळुंखे हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना ‘महाराष्ट्र मिशन’च्या प्रतिनिधीने पीडित अवस्थेत पाहून येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना व पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले. नागरिकांनी जखमींना दिलासा दिला आणि प्रथमोपचार केले. घटनास्थळी तत्काळ येरवडा पोलीस दाखल झाले. वाहतूक सुरळीत करुन आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page