पुणे शहर

विषारी दारू प्रकरण; राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस दलातील १५ अधिकारी, कर्मचारी निलंबित 

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू पिऊन १९ जणांचा मृत्यु झाला. या घटनेत हातभट्टी दारुची विक्री ज्या हद्दीत झाली त्या हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांना सेवेतून निलंबित केले. तसेच दापोडी पोलीस ठाण्याच्या ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांना निलंबित करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुध्दा ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वतीने हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षक हसिना सिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पोलीस अंमलदार विशाल काळे, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव यांना निलंबित केले आहे.

हडपसर फुगेवाडी परिसरात विषारी दारूची विक्री केली गेल्याने त्यात हडपसर, फुगेवाडी परिसरातील १९ जणांचा मृत्य झाला. या घटना पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे घडलेली आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे कारण नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page