लोणावळ्यात वर्षापूर्वी पिकअप टेम्पो चोरी करणारा सराईत ताब्यात, वाघोली पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी

पुणे : मावळ तालुक्यातील औढोली, लोणावळा भागातून एका घरासमोरुन एक वर्षापूर्वी पिकअप टेम्पोची चोरी झाली होती. चोरी करणारा सराईत वाघोलीत टेंपोसह ताब्यात घेण्यात आला. गाडी चोरली असल्याचे त्याने कबूल केले. वाघोली पोलीस स्टेशनने ही उल्लेखनिय कामगिरी केली.
सुनिल अण्णा कांबळे (वय ४० वर्षे रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे त्याचे नाव आहे. वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे हवालदार प्रदिप मोटे यांना माहिती मिळाली की एक अर्धवट नंबर प्लेट असलेली संशयित, पांढऱ्या रंगाची पिकअप वाघोली बाजारतळ येथे उभी आहे. गस्तीवरील पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये वाहन चालकाचे जागेवर एक जण बसलेला मिळून आला. पिकअप गाडीचे कागदपत्र व नंबर बाबत विचारणा करता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यास पिकअप टेम्पोसह वाघोली पोलीस स्टेशन पुणे येथे आणले. सखोल चौकशी करण्यात आली.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे येथील अभिलेख फोनद्वारे पडताळणी केली असता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.न. १२/२०२४ भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी व गाडी पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आली.
ही कामगिरी अमितेशकुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर) मनोज पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) हिम्मत जाधव (पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४) प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, तपास पथक अधिकारी मनोज बागल, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश साबळे, हवालदार १५०३ बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, शिपाई १०३५६ शिवाजी चव्हाण, १०५८० समीर भोरडे, २७७० दिपक कोकरे, ४५८५ साईनाथ रोकडे, १०५९४ पांडुरंग माने, २६०२ विशाल गायकवाड, ८५४२ मंगेश जाधव, राजाराम अस्वले, शिवाजी सालके, ४४४८ प्रितम वाघ, यांनी केली आहे.



