कृषीमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची २८ जुलै रोजी बैठक 

कांदा उत्पादक शेतकरी हैराण

नाशिक : एकीकडे कांदा बाजारभावात होत असलेली घसरण, सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने बैठक आयोजित केली आहे.

लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये ही बैठक होणार आहे. कांद्याच्या बाजारभावावरील गंभीर स्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे.

उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी अति तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देणे, तसेच आवश्यक उपाययोजना सुचवणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page