गुन्हेगारीपुणे शहरसातारा

सातारा पोलिसांकडून दरोडेखोराचा शिक्रापूरमध्ये एन्काऊंटर

पुणे : साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार लखन भोसले याचा शनिवारी सायंकाळी पुण्याजवळ शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला. सोनसाखळी चोरीप्रकरणी फरार असलेला लखन पोलिसांच्या हाती लागल्यावर चाकूने हल्ला करत पलायन करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

सातारा, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमुळे लखन भोसले हा पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरला होता. गुरुवारी त्याने साताऱ्यात एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून अंगावरील दागिने लुटले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.

सातारा पोलिसांच्या पथकाने शिक्रापूर येथे शोधमोहीम राबवली. पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न करताच लखनने साथीदारांसह पोलिसांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये काही पोलीस जखमी झाले. परिस्थिती बिघडताच पोलिसांनी गोळीबार केला. पाठीवर गोळी लागल्याने लखन जागीच कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. त्याचा एक साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.

लखन भोसलेच्या खातम्यानंतर शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक गुन्हेगाराला ठार मारल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page