गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (३० ऑगस्ट) सहकुटुंब मुंबईतील ‘लालबागच्या राज’चं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे नेतेही हजर होते. दरम्यान, अमित शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अमित शाह यांची गणेशोत्सवाप्रती विशेष श्रद्धा आहे. दरवर्षी ते लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. यंदाही अमित शाह सहकुटुंब मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
याआधी अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षावर जाऊन बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. याशिवाय, ते अंधेरी (पूर्व) इथल्या श्रीमोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. अमित शाह अंधेरीत पहिल्यांदा गणपती मंडपात बाप्पाचे दर्शनासाठी आले असल्यामुळे अंधेरीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.



