आंतरराष्ट्रीय

अर्थशास्त्रज्ञ हिंदू समर्थक अबुल बरकत बांगलादेशात अटकेत 

ढाका : प्रसिद्ध बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञ हिंदू समर्थक अबुल बरकत यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. २००९ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांना जनता बँकेचे अध्यक्ष बनवण्यात आले. ते हिंदू अल्पसंख्याकांच्या बाजूने बोलण्यासाठी देखील ओळखले जातात. बरकत यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणींवर, विशेषत: जमात-ए-इस्लामीसारख्या शक्तींवर उघडपणे टीका केली आहे.

अबुल बरकतसह एकूण २३ जणांना आरोपी करण्यात आले आहे, ज्यात बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर अतिउर रहमान यांचा समावेश आहे. शुक्रवारी न्यायालयात हजर असताना एसीसीने तीन दिवसांच्या रिमांडची मागणी केली, तर बचाव पक्षाने जामीन अर्ज दाखल केला.

बरकत यांनी ‘पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग ऍग्रिकल्चरल लँड-वॉटर बॉडीज इन बांगलादेश’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी असा दावा केला आहे की १९६४ ते २०१३ दरम्यान १.१३ कोटी हिंदूंनी धार्मिक छळामुळे बांगलादेश सोडला. बरकत यांच्या मते, २०१६ मध्ये दररोज ६३२ हिंदू देश सोडून जात होते, म्हणजेच दरवर्षी २,३०, ६१२ हिंदू देश सोडून जात होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page