मराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजना बंद? ‘आनंदाचा शिधा’पाठोपाठ सरकारची दुसरी योजना बंद

मुंबई : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बस्त्यात असल्याची चर्चा आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’योजनेवरही लाल शेरा मारण्यात आला आहे. ही योजना एकच वर्ष राबवण्यात आली. यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आली आहे.

शिंदेंनी मुख्यमंत्री असताना एकामागोमाग एक अशा दोन योजना निकाली काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्याकरण करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी ही एक योजना मानली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेली ही योजना राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. ही योजना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राबवली जाते. योजनेचा मुख्य उद्देश शाळांना तंत्रज्ञानस्रेही, स्वच्छ आणि आकर्षक बनवणे, विद्यार्थी-शिक्षक सहभाग वाढवणे आणि शाळा सुधारणेसाठी प्रोत्साहन देण्याचा होता. राज्य स्तरावर पहिल्या येणा-या शाळेला ५१ लाखांचे बक्षीस दिले जायचे.

२०२३-२४ मध्ये डिसेंबर २०२३ रोजी या योजनेला सुरुवात झाली. फेब्रुवारी-एप्रिल स्पर्धा झाली ऑक्टोबर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र पुढल्या वर्षी म्हणजेच २०२४-२५ मध्ये या योजनेचा टप्पा २ सुरू झाला, परंतु मुदतवाढ घेतली गेली.

योजना ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाली आणि २०२३-२४ मध्ये यशस्वी राबवली, परंतु २०२४-२५ साठी अंमलबजावणी ठप्प झाली आहे. निधी अभाव आणि राजकीय बदलांमुळे (महायुती सरकार) ही योजना थंड बस्त्यात पडली किंवा बंद झाली असल्याची चर्चा आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली, की एकनाथ शिंदे यांच्या योजनांना ब्रेक मिळाला. अधिकृत घोषणा नसली तरी संभ्रमावस्था कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page