क्रीडामराठवाडामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसामाजिक

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असणे बंधनकारक 

शिक्षक नसल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द होणार

मुंबई : अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

देशात ६५४ टक्के तरुणवर्ग असून त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून क्रीडा संकुल शाळा आणि महाविद्यालयांशी जोडण्यात येणार आहेत, असे कोकाटे यांनी सांगितले. मुंबईत खेळासाठी वक्­फ बोर्डाच्या जागा उपलब्ध करण्यात येतील. तसेच आपल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी कतार येथे खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी कतारसोबत करार करण्यात येणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.

दरम्यान, सर्वसमावेशक आणि सुधारित युवा धोरणाची गरज १३ ते ३५वर्ष वयोगटातील युवकांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये तसेच जबाबदा-या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन कोकाटे यांनी यावेळी केले. तसेच भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘सरदार @१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page