पुणे शहरमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

जुन्या पुण्यातील मटका, जुगार अड्ड्यांचा सूत्रधार पोलीस कर्मचारीच

पुणे : फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून कसबा पेठ आणि मंगळवार पेठेत मटका, जुगार अड्डे सुरू असून या मध्ये मोठा पत्त्याचा क्लब व मटका जुगार अड्ड्यांचा समावेश आहे. मोहिते नामक पोलीस कर्मचारी यामागे असून तो यापूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात होता. त्यामुळे अवैध धंद्यावर त्याचा अधिक प्रभाव आहे.

कोणाला कुठल्या ठिकाणी अवैध धंद्यासाठी परवानगी द्यावी किंवा रोखावी याची सारी सूत्रे त्याच्या हाती असल्याचे बोलले जाते. त्याची नेमणूक फारसखाना पोलीस ठाण्यात असल्याने जुन्या पुण्यात असलेले हातभट्टी दारु, मटका, गांजा, गुटखा अशा धंद्यांची माहिती त्याला बारकाईने आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सध्या त्याची नेमणूक असली तरी तो फरासखाना हद्दीत मोठ्या प्रमाणात वसुलीबाजी करत आहे. मंगळवार पेठेत जुना बाजार भीम नगर, गल्ली नंबर २२८ येथे दुमजली सदनिका मधील पहिल्या मजल्यावर पत्त्याचा क्लब, जुगार अड्डा सुरू आहे. सुमित नावाचा इसम हा जुगार अड्डा चालवत आहे.

कसबा पेठ, कागदीपुरा येथे भंगार दुकाना जवळ मटका, जुगार अड्डा सुरू आहे. सदर मटका , जुगार अड्डा हा खैरमोडे नावाची व्यक्ती चालवत आहे. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी गर्दी जमा होत असून अनेक नागरिकांना याचा मोठा त्रास आहे.

मंगळवार पेठेतील गल्ली नंबर २२८ मधील पत्त्याचा क्लब सुध्दा रात्रभर मोठ्या प्रमाणात चालतो. सदर जुगार अड्डा हा भर लोकवस्ती मध्ये आहे.

 मुख्य दरवाजाला कुलूप आत मध्ये मात्र जुगार सुरूच

मंगळवार पेठेतील जुना बाजार, भीम नगर गल्ली नंबर २२८ मध्ये भर लोक वस्तीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस कारवाई न होण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. इमारतीच्या मुख्य दरवाज्याला कुलूप लावून आत मध्ये मात्र पत्त्याचा जुगार सुरूच असतो. या साठी बाहेर एक व्यक्ती पहारा देण्यासाठी असतो असे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page