गुन्हेगारीपुणे शहर

पुणे शहर गुन्हे शाखेकडून ३,१०,००० चे मोबाईल केले हस्तगत

पुणे : गहाळ झालेल्या तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा पुणे शहर व इतर अनेक ठिकाणांहुन शोध घेवून वेगवेगळया कंपनीचे व किंमतीचे २१ मोबाईल फोनचा शोधण्यासाठी पोलिसांनी परिश्रम घेतले. सदर मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन युनिट २ च्या हद्दीतील पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यात, मिळून आलेल्या मोबाईल फोनबाबत संबंधितांशी संपर्क करुन त्यांचे किंमती मोबाईल फोन परत करण्यात येत आहेत.

पुणे शहरात मोबाईल फोन हरवल्याबाबत व चोरी झाल्याबाबत अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार डिसेंबर २०२५ मध्ये पेट्रोलिंग दरम्यान हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत होते.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शपंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, तसेच संजय जाधव, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय कुमार पवार, नागनाथ राख, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात, विशाल दळवी, अजीम शेख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, संदिप शिर्के व विनायक वगारे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page