पुणे : चेतन बाळु जाधव (वय २५ वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ करंजे नगर शिक्रापूर चाकण चौक, पुणे) याला ताब्यात घेवुन त्याच्या कब्जातून १ गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले.
शहरामध्ये अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींची माहिती काढुन सबंधीत आरोपींवर कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयातून वेळोवेळी सुचना देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ छगन कापसे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ५ पथक अवैध अग्नीशस्त्राबाबत गोपनीय माहिती काढत होते.
दि.२६ जानेवारी रोजी पोलीस अभिलेखावरील आरोपी चेतन बाळु जाधव हा मगरपट्टा ब्रीजखाली गावठी बनावटीचे पिस्टलसह येणार असल्याची गोपनीय बातमी गुन्हे शाखा युनिट ५ पथकडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना मिळालेली होती.
आरोपी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २, राजेंद्र मुळीक यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली.
पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, राहुल ढमढेरे, अमित कांबळे, परमेश्वर कदम, अमर चव्हाण, विनोद शिवले, शशिकांत नाळे, गणेश माने, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शहाजी काळे, प्रशांत कर्णवर, अविनाश इंगळे, नानासाहेब मोरे, नेत्रिका अडसुळ व नासिर देशमुख यांच्या पथकाने सहभाग घेतला.
अमित कांबळे यांची कामगिरी
पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार अमित कांबळे यांनी आज पर्यंत अनेक गुन्हेगारांकडून अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. त्यांचे खबऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणामध्ये असून त्याचा उपयोग त्यांना घातक आरोपींचा छडा लावण्यासाठी होतो. तडीपार असताना शहरात गुन्हे करणारे किंवा मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपींना शिताफिने पकडण्यात त्यांना अनेक वेळा यश आले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमी कौतुक झाले आहे.



