पुणे : पुणे बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत काळुराम भुजबळ यांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. भुजबळ यांना ३ हजार ८०७ मते मिळाली. एकूण ७५०० वकिलांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते.
कार्यकारिणी सदस्यपदी सर्वसाधारण गटातून मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत कांताराम नप्ते ३ हजार ६१९ मते तर प्रतापराव मोरे हे २ हजार ७०६ मते घेऊन विजयी झाले. महिला राखीव गटातून प्रितीसिंह परदेशी यांना ३ हजार ४७ मते मिळाली.
सचिव पदी सम्राट जांभुळकर आणि अभिजीत पोळ हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे ४ हजार २७२ आणि ३ हजार ३४४ मते मिळाली. महिला राखीव गटातून पूजा पवार यांनी ३ हजार ८७६ मते मिळवित विजय संपादन केला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत अंजली बांदल यांनी निर्विवाद वर्चस्व राखत ५ हजार २७४ मते मिळविली. ऑडिटर पदासाठी झालेल्या लढतीत शिवराज निंबाळकर यांना ५ हजार २९० मते मिळाली. तर महिला गटातून नेहा जांभळे यांनी ४ हजार ४ मते मिळवली.



