
पुणे : सरहद पुणे, येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. राज्यातील ३५ शाळेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेचे विषय हे ताराराणी यांच्या जीवनावर आधारित होते.स्पर्धेकरिता भाषेचे बंधन नसल्याने स्पर्धेला खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नगर सेविका वर्षा तापकीर, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, मुख्याध्यापिका सुजाता गोळे, गीता खोत, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक मयूर मसुरकर, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख तर परीक्षक म्हणून लाभलेले तिन्ही इतिहास अभ्यासक, लेखक व कवी सचिन खोपडे, गोपाळ कांबळे, रश्मी वानखडे हे यावेळी उपस्थित होते. तसेच पुढे परीक्षक म्हणून तिघांनी काम पाहिले.
५ वी ते ७ वी गटातून
⬛ प्रथम क्रमांक – गुंजन राऊत, ज्ञानेश प्राथमिक शाळा
⬛ द्वितीय क्रमांक – ईश्वरी शिवतरे , महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कन्या शाळा, वाई
⬛ तृतीय क्रमांक- श्रावणी तावरे कान्होजी जेधे विद्यालय, कारी तालुका हिने पटकावला तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक स्पर्श कालवणकर- ब्लॉसम पब्लिक स्कूल नऱ्हे , अवनि उल्हाळकर – सरहद स्कूल कात्रज, श्लोक विश्वासराव- पी.इ.एस मॉडेल इंग्लिश हायस्कूल शिवाजी यांनी पटकविले.
८ वी ते १०वी गटातून
⬛ प्रथम क्रमांक- वक्रतुंड कारले, सरहद ग्लोबल स्कूल गुजरवाडी
⬛ द्वितीय क्रमांक- अनुष्का बाबर, सुंदराबाई मराठे विद्यालय
⬛ तृतीय क्रमांक- अलफिया पठाण सिग्नेट पब्लिक स्कूल नऱ्हे यांना मिळाला.
⬛ उत्तेजनार्थ पारितोषिक अंकिता जाधव- चाटे पब्लिक स्कूल, सान्वी मुंदडा- पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव, आराध्या गर्जे- सरहद पब्लिक स्कूल धनकवडी. या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली.



