पुणे शहर

वाघोली पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी; अमली पदार्थाची तस्करी करणारा दुसरा आरोपी जेरबंद

पुणे : कार मध्ये २८ लाख रुपये किंमतीचा लपवून ठेवलेला १३४ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी) जप्त करुन फोरव्हीलर कार, मोबाईल असा एकूण ५४,९०,००० रुपये किंमतीचा माल वाघोली पोलीस स्टेशनच्या पथकाने जप्त केला.‌ या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

किशन नंदकिशोर लधड ( वय ३५ वर्षे, रा. सव्हें १५६/१, स्लोम प्रेस सेंटर भैरवनगर धानोरी ) याच्याकडे पोलीस कोठडीत तपास केला असता अंमली पदार्थ विक्री करणारा त्याचा साथीदार हनुमान रुपाराम चौधरी (वय ३३, रा. फ्लॅट न. ३०२, प्लॉजोग्रीन बिल्डींग, वडगाव मावळ) हा सुध्दा राजस्थान येथील असल्याचे तपासात आढळून आले.

दोघे व त्यांचे इतर साथीदार एमडी अमली पदार्थ व्यवसायात गेल्या वर्षभरापासून सक्रिय आहेत. एमडी हा अमली पदार्थ राजस्थान येथील इसमाकडून मागणी करून पुणे परिसरात व्यवसाय करीत असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.

हनुमान रुपाराम चौधरी याच्याबाबत हवालदार प्रदीप मोटे, व पोलीस अंमलदार शेखर शिंदे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वडगाव मावळ परिसरात शोध घेतला गेला. तो वापरत असलेल्या महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कार्पीओ (एम एच १४, के जे ७४५५) मध्ये आरोपीने ठेवलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

फॉरचुन हॉस्पीटल जवळ, केसनंद येथे किशन नंदकिशोर लधड यास पूर्वी पकडण्यात आले होते. मॅफेड्रॉन विक्रीसाठी बाळगताना मिळून आल्याने वाघोली पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ऍक्टकलम ८ (क), २१ (च), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर गायकवाड यांनी सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत, मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. त्यानुसार नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन व त्यांचा स्टाफ यांनी हनुमान रुपाराम चौधरी याचा शोध घेतला.

ही कामगिरी अमितेश कुमार (पोलीस आयुक्त) रंजनकुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त/ मनोजकुमार पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग) सोमय मुंडे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७ नुतन पवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पल्लवी मेहेर (पोलीस निरीक्षक, गुन्हे) अमोल काळे (पोलीस उपनिरीक्षक) तसेच पोलीस हवालदार प्रदीप मोटे, पोलीस अंमलदार शेखर शिंदे, पोलीस अंमलदार विशाल गायकवाड, पोलीस अंमलदार मारुती वाघमारे या पथकाने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page