महाराष्ट्र

वारकरी परंपरेला काळिमा; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा स्वत:ला महाराज म्हणवून घेतो. ३८ वर्षांच्या या नराधमाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला धाक दाखवून एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पकडने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा पाच वर्षांपासून अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करत होता. मुलीवरील अत्याचाराची तक्रार तिच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर तातडीने कारवाई करत अण्णासाहेब गुंजाळ या नराधमाला रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला रविवारी सुटीच्या कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page