पुणे शहर

पुण्यात १ लाख रुपयांची लाच घेताना फौजदार एसीबीच्या जाळ्यात

पुणे : बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीबाबत तक्रार अर्जाची चौकशी करताना २ लाख रुपयांची लाच मागून १ लाख रुपये घेणाऱ्या फौजदार संदीप खेडकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर (फ्लॅट नं. बी १/५०४ गंगा समृद्धी अपार्टमेंट, एस आर पी एफ नं.१ च्या ४४२ गेट जवळ, वानवडी)

याने तक्रार अर्जामध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचासमक्ष तसेच तक्रारदाराच्या वकीलासमक्ष तक्रारदाराकडे स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदार यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे ३ फेब्रुवारी रोजी तक्रार झाली होती. तक्रारदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान संदीप खेडकर याने पैसे मागितल्याचे सिध्द झाले.

लोकसेवक संदीप खेडेकर याच्याविरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ, पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर आदींनी ही कारवाई केली.

शासकीय कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजंट हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (मो.क्र. 9823167154) तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अजीत पाटील (मो.क्र. 9029030530) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page