पुणे शहर

अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च; तरीही नाले मैलापाण्याने तुडुंब 

'आपले पुणे आपला परिसर' ची तक्रार 

पुणे : अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजची समस्या या गावांच्या मध्ये असेल आणि नाले मैलापाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत तर नेमके काम काय झाले याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी ‘आपले पुणे आपला परिसर’ स्वयंसेवी संस्थेने स्थायी समितीकडे केली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर , सुहास कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत बधे हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत‌.

प्रशासकराज मध्ये मलनि:सारण ५७१.९५ कोटी आणि मलनिःसारण प्रकल्प ५७४ कोटी असे ११४५.९५ कोटी खर्च झाले असे आकडे आहेत. याबाबत प्रशासनाकडून

सविस्तर माहिती घ्यावी. आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकातील आकडे तपासताना ही बाब लक्षात आली, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.

केसकर यांनी सांगितले की आपण जर पाहिले तर सर्व नाल्यांमधून नदीकडे ड्रेनेजचे पाणी जाताना दिसते, याचा अर्थ ड्रेनेज लाईनचे नेटवर्क नीट जोडले गेले आहे का नाही याची देखील विचारणा करावी.

सल्लागारांनी तयार केलेला सविस्तर अहवाल, टेंडरची कॉपी, प्रत्यक्ष जागेवर झालेले काम अधिकाऱ्यांनी तपासून तयार केलेली बिले ही एकदा नीट तपासणी करणे आवश्यक आहे.

एक-दोन कंत्राटदार आणि वर्षानुवर्ष त्या खात्यामध्ये बसलेले अधिकारी यांच्या संगनमताने हे होत नाही ना हे देखील तपासले पाहिजे.

कंत्राटदाराच्या ईनोव्हा कारचे गूढ

ड्रेनेज प्रकल्प विभागाने ड्रेनेजचा मास्टर प्लॅन हा ११ गावे अधिक २३ गावे नंतर समाविष्ट झालेले तयार करून टेंडर काढले होते.

तसेच जे अधिकारी ११ गावांना काम बघत होते त्यांना बोगस कामे केल्यामुळे २३ गावातील प्रकल्पातून वगळण्यात यावे.मलनि:सारण या खात्याच्या एका कार्यकारी अभियंता कडे आणि एका उपअभियंता सारख्या अधिकार्‍यांच्याकडे प्रकल्पाच्या नावाखाली अधिकृत कंत्राटदाराच्या ईनोव्हा कार आहेत त्याबाबत देखील माहिती घ्यावी. तसेच ‘एसडी’ची कामे कधी पूर्ण होणार की आयुष्यभर चालूच राहणार आहे याचाही अहवाल मागविणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page