पुणे शहर
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांमुळे उपद्रव

पुणे : शहराच्या हद्दीमध्ये अवैध धंदे आणि त्यांचा सामान्य लोकांना होणारा उपद्रव थांबण्याचे नाव घेत नाही. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार, मटक्याचे २ धंदे सुरू असल्याचे पुढे आले आहे.
मिनाताई ठाकरे वसाहतीत सार्वजनिक शौचालय जवळ जुगार आड्डा सुरू आहे. तसेच स्वारगेट पीएमटी स्टँड जवळ असलेल्या मुठा नदीच्या कॅनॉल शेजारी मटका जुगार, पत्त्याचा जुगार अड्डा सुरू आहे.
या अड्ड्यावर दिवसरात्र येणाऱ्या शौकिनांनी नशा पाणी केलेले असते. त्यांची आपापसात वादावादी होते. त्याचा त्रास शांतताप्रिय नागरिकांना होतो. त्यामुळे या धंद्यांवर कारवाई करण्यात येणार की त्रास असाच सुरू राहणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.



