आरोग्यमहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

खासदार संजय राऊत उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांना भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार राऊत यांनी काही दिवसांपूर्वी याच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रक्त तपासण्या करून घेतल्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. राऊत यांच्या तब्येतीबद्दल सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page