आरोग्यगुन्हेगारीपुणे शहरशैक्षणिकसामाजिक

वाघोलीत पानटपरी चालकांकडून बिनधास्त गुटखा विक्री, हप्ते वसूल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळे व्यसनाचा फैलाव

पुणे : महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची वाघोली परिसरामध्ये सर्रास होलसेल आणि किरकोळ विक्री सुरू असून वारकरी आणि महाविद्यालय तरुण मुले व्यसनाच्या विळख्यात गुरफटत आहेत. गुटखा विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या भ्रष्ट पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत.

पोलीस कर्मचारी प्रशांत धुमाळ वाघोली मध्ये गुटखा विक्रेत्यांकडून वसुली करत आहे. तसेच पानटपरी चालकांकडून सुध्दा दीड ते दोन हजार रुपये हप्ता वसुली करत आहे अशी चर्चा जोरदार सुरू आहे.‌ तो असे धाडस कसे करु शकतो याबद्दल नवल व्यक्त होत असून त्याला कुण्या अधिकाऱ्याची तर फूस नाही ना? कशी शंका व्यक्त होत आहे.

बंदी असलेल्या गुटखा विक्रीवर कारवाई करण्याऐवजी पोलीस कर्मचारीच हप्ते वसूल करुन विक्री करणाऱ्यांना मोकळीक देत असेल तर व्यसनाधीनता फैलावत जाईल, अशी भिती व्यक्त होत असून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या पोलीस कर्मचाऱ्याला अद्दल घडवावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page