महाराष्ट्रमुंबई

प्रदूषण करणाऱ्या उद्योगांबाबत धोरणात बदल करणार 

मुंबई : वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांकडून घेतल्या जाणाऱ्या बँक हमी (बँक गॅरंटी) आणि दंडाच्या रकमेबाबतचे धोरण २०१३ पासून बदललेले नाही. त्यामुळे या धोरणात बदल करण्यासाठी अभ्यास करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

वारंवार प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम वाढविण्यासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, सहसंचालक (जल) जगन्नाथ साळुंखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page