खंडणीसाठी चहा दुकानदाराला बेदम मारहाण करणाऱ्या टोळक्यातील दोघे गजाआड
विमानतळ पोलिसांची कारवाई

पुणे : विमाननगर भागात “काकाचा चहा” दुकानाचे व्यावसायिक विकास श्रीचंद्रपाल सिंग (वय ३५ वर्षे, राई ३ बिल्डींग, फलॅट नं २३ गंगापुरम सोसायटी विमाननगर) हे १८ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास गंगापुरम सोयायटी समोरील चहा दुकानात हजर होते. नरेंद्र रणसिंग ( संजय पार्क विमाननगर) सोमनाथ गायकवाड, व रोहित (पूर्ण नाव पत्ते माहित नाहीत) यांनी दुकानात जाऊन फिर्यादीला लोखंडी हत्याराचा धाक दाखवला. खंडणीची मागणी करुन बेदम मारहाण करुन पळ काढला. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन विमानतळ पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक शोध घेत असताना पोलीस अंमलदार दादासाहेब बर्डे, नाना कर्चे व योगेश थोपटे यांना आरोपी म्हाडा कॉलनी जवळील मैदानात आल्याची बातमी मिळाली. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांना ही माहिती दिली असता त्यांनी विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना कळविली. त्यांनी शहानिशा करून कारवाई करण्याचे तात्काळ आदेश दिले. ढावरे यांनी स्टाफसह यातील आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले. रोहित नागेश कोळी (वय २२ वर्षे रा संजय पार्क गल्ली नं ३ न्यु एअरपोर्ट रोड लोहगाव ) सोमनाथ दिपक गायकवाड (वय २१ वर्षे रा गल्ली नं ५ संजयपार्क विमाननगर ) अशी त्यांची नावे आहेत. दाखल गुन्हयात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वाकडे करीत आहेत. सदरची ही कारवाई रंजन कुमार शर्मा (अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर) शशिकांत बोराटे (पोलीस उपआयुक्त परिमंडळ – ४) किशोर जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग) विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, संगीता माळी पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे नाना कर्वे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली.




