गुन्हेगारीपुणे शहर

बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात नवी माहिती

आरोपी एकच : पोलीस आयुक्त

पुणे : पुण्याच्या पत्रकारिता तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे कथित स्टिंग ऑपरेशन आणि त्यानंतर इतर पत्रकारांवर एका राजकिय महिला पदाधिकरी यांनी केलेल्या आरोपाबाबत आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यावरून यात असे काही घडले नसल्याचे सद्य परिस्थितीत व आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकाच पत्रकाराने महिलेचे शुटिंग काढले. त्याच्यासोबत इतर कोणीही नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

ते म्हणाले, ”भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडताना त्याने “आमच्यासोबत इतर पत्रकार होते, आम्ही स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो” असा दावा केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासात तो पूर्णपणे एकटाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली आहे. त्याला अटक झाल्यास अधिक माहिती पुढे येऊ शकते ”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page