महाराष्ट्र

पाण्याचा टँकर ट्रॉली चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश 

शिरूर: पाण्याचा टँकर ट्रॉली चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले असून एका आरोपीला अटक करुन १,८०,००० किंमतीचे दोन टँकर व टँक्टर असा मुद्देमाल जप्त करत एकूण दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले. संदिप उर्फ पप्पु आबासाहेब जाधव ( वय ३६ वर्षे रा पळवे बुद्रुक ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव (ता. शिरुर) येथील अशोक किसन भुजबळ या शेतकऱ्याने शेता करीता सहा हजार लिटर क्षमतेची टॅंकर ट्रॉली बनवून घेतली होती. ती मार्च महिन्यात रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टिने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अमंलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना कौशल्यपुर्वक आरोपींचा शोध घेउन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

तपास पथकाने रांजणगाव, कोरेगाव व परिसरातील सीसीटिव्ही तपासून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेणे सुरु केले. पोलीस अंमलदार योगेश गुंड यांना बातमी मिळाली की, पळवे (ता. पारनेर जि. अहिल्यानगर) येथील एक जण रात्रीच्या वेळी टँक्टर घेऊन येऊन पाण्याचे टॅंकर ट्रॉली चोरुन घेउन जात असले बाबत माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषना चे आधारे गुन्ह्यातील अज्ञात चोरटा हा त्याच भागातील असल्याचे निष्पन्न झाले.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने चोरी गेलेली टॅंकर ट्रॉली जप्त करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपींनी ढोकेश्वर टाकळी येथून आणखी एक टॅंकर ट्रॉलीही चोरुन आणली होती. ती पण जप्त करण्यात आली असून आरोपी कडून गुन्हा करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर व चोरी केलेले दोन टँकर ट्रॉली असा १ लाख ८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक

रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार वैभव मोरे, योगेश गुंड, उमेश कुतवळ, किशोर शिवणकर यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page