पुणे शहर

फुलचंद पानातून नशेकरीता वापरत असलेला मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्यास अटक

पुणे: फुलचंद पानातून नशेकरीता वापरत असलेला मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या

आरोपीस शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले. विष्णु रामरतन गुप्ता, (वय ३० वर्षे रा. पिंपरी चिंचवड) असे त्याचे नाव असून मादक बंट्याच्या गोळया असलेली पाकिटे असलेली गोण्या व टेम्पो असा ३,३८,८८० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. बंट्यांच्या गोळया या अलीकडे पुण्यात फुलचंद पानात देखील वापरत असल्याबाबत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, व स्टाप असे पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना खास माहिती मिळाली की, दिनदयाळ हॉस्पीटल जवळील निर्जन रस्त्यावर, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी ब-याच वेळापासुन एक मोटार टेम्पो बेवारस व संशयास्पद स्थितीत उभा आहे.

पाठीमागील बाजुकडील दरवाजाची कडी उघडून खात्री करण्यासाठी आतमध्ये पाहिले असता त्यामध्ये प्रतिबंधित व बेकायदेशीर अंमली पदार्थ दिसून आला.

शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक केलेली आहे. सदर गुन्हयात इतर आरोपींचा सहभाग आहे का अगर कसे? याबाबत तपास चालु असून पोलीसांनी केलेल्या तपासात सदर गुन्हयातील जप्त करण्यात आलेल्या त्याबाबत देखील पोलीसांचा अधिक तपास चालु आहे. काही दिवसांपूर्वी पानांमध्ये किक बसण्यासाठी मादक पदार्थ तयार करणार्‍या मुळशी तालुक्यातील कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठा माल पकडला होता.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परि-१ कृषीकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग चंद्रकांत भोसले, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील,पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, मोहिते, दिपक रोमाडे, श्रीकांत मखरे आदींनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page