पुणे शहर

नसरापूर बालिका दुर्घटना ; विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथील धक्कादायक बलात्कार व खून खटल्यात नाशिकचे जिल्हा सरकारी वकील आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांची या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकरणात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून जलद गतीने सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यपालांच्या स्वाक्षरीने तसा अध्यादेशही प्रसिद्ध झाला आहे.

ॲड. अजय मिसर हे २०१६ पासून नाशिकचे जिल्हा सरकारी वकील आहेत. त्यांच्याकडे गुंतागुंतीचे आणि संवेदनशील खटले चालवण्याचा मोठा अनुभव आहे.

त्यांनी यापूर्वी रवी पुजारी विरुद्धचे खटले, मालेगाव बॉम्बस्फोट, २०११ साखळी बॉम्बस्फोट आणि लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांविरुद्धचे खटले यशस्वीरीत्या चालवले आहेत. नाशिकच्या गाजलेल्या सातोते खून खटल्यात सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वा

टा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page