गुन्हेगारीपुणे शहर

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; शिरूरमध्ये २२ लाखांच्या एमडीसह दोन आरोपी जेरबंद!

विशेष प्रतिनिधी, पुणे / महाराष्ट्र मिशन : नशामुक्त भारत आणि ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. शिरूर परिसरात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कारवाई करत तब्बल १११ ग्रॅम वजनाचा आणि २२ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ (एम.डी.) जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही धडक कामगिरी पार पाडली.

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. तुषार पांढरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मलठण गावच्या हद्दीतील राजावाडा चौक येथे सापळा रचण्यात आला.

सुरेंद्रसिंह भैरूसिंह राठोड उर्फ राजपूत (वय २४ वर्षे, रा. सध्या मनीषा शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकीयावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१ वर्षे, रा. सध्या मनीषा शिरोळे फॉर्म हाऊस, मलठण, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. गोगादेव की ढाणी, बांकीयावास खुर्द, ता. कल्याणपूर, जि. बाडमेर, राज्य राजस्थान) या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून १११ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ तसेच एक मोटार सायकल असा एकूण २२,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४४४/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सोपान नेतेकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग आणि स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनच्या अंमलदार पथकाने पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page