गुन्हेगारीपुणे शहरसामाजिक

बोपोडीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर ‘मकोका’ कारवाई

पुणे : बोपोडी परिसरात संघटीत गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सुंद्री गण्या व त्याचे २ अल्पवयीन साथीदार यांच्या गुन्हेगारी टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. जबरी चोरी, प्राणघातक हल्ले करणे असे गंभीर गुन्हे करणारी ही टोळी अनावर झाली होती.

टोळी प्रमुख गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या ( वय २०, रा. बापू काटे चाळ, वार्ड क्र. ३, दापोडी) इम्रान गफार शेख ( वय १६ वर्षे ९ महिने, रा. मुन्सिपाल्टी चाळ, सिध्दार्थनगर, लोणावळा) अली वसीम खान (वय १६ वर्षे ८ महिने, रा. पवार वस्ती, नालंदा बुध्द विहाराजवळ, दापोडी) हे रेकॉर्डवीरल गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी, प्राणघातक हल्ले करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

३० जून रोजी दुपारी ४ च्या सुमारास बापोडी येथील घरातून भाजीपाला आणण्यासाठी पवन पवरचंद घागट (वय ४६ वर्षे, धंदा-नोकरी, रा. सर्व्हे नं.२५ आझाद मित्र मंडळ, बोपोडी) हे बाजारात जात होते. बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले. मागून ऍक्टीव्हा मोपेड गाडीवर येऊन सुंद्री गण्या व साथीदारांनी रांग सोडून पुढे येत घागट यांच्या गाडीला धक्का दिला. त्यांना जाब विचारता त्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करून ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत. तू ओळखत नाही काय ‘असे म्हणून सुंद्री गण्या याने कमरेला शर्टच्या खाली ठेवलेला कोयता काढून कोयत्याने घागट यांच्या डोक्यावर वार केला. तो वार त्यांनी चुकवला. वार कानाला लागून जखम झाली.

सुंद्री गण्या याने कोयता हवेत फिरवून लोकांना दमदाटी केली. याबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १९५/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म ऍक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४(२५) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुंद्री गण्या याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचार करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवत गुन्हेगारी कृत्य करणारी टोळी तयार केली. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील तो जुमानत नसल्याने , वर्तनात सुधारणा होत नसल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू करण्यासाठी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी परिमंडळ ४ चे पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग रंजन शर्मा यांनी प्रकरणाची छाननी करुन टोळीविरुध्द खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. १२७/ २०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म ऍक्ट कलम ४(२५), सह क्रिमिन लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)३ सह १३५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) ३(४) चा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, उप निरीक्षक अण्णा गुंजाळ, संतोष भांडवलकर, अंमलदार राजकिरण पवार, जाधव यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page